पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे, आमेन ;मराठी


हे प्रभु येशु तू या जगात असताना आपल्या पित्यापाशी कळकळीने प्रार्थना केलीस, आज आम्ही नोव्हेनामध्ये करीत असलेल्या प्रार्थना व आमच्या विनंत्या तू स्वीकार, आम्ही या तिर्थस्थली असलेल्या सेवकांसाठी सर्व भाविकांच्या हेतुंसाठी व ज्यांनी आपल्या विनंत्या येथे पाठविलेल्या आहेत, त्या सर्वांसाठी प्रार्थना करतो, तसेच आमच् आध्यात्मिक व भौतिक उद्देशांसाठी करीत असलेल्या प्रार्थना तू ऐक, (आपले हेतु व्यक्त करा). तुझी आई व माझी आई पवित्र मरीया हिच्याद्वारे मी प्रार्थना करतो, कारण पवित्र मरीया ख्रिस्ती लोकांची मध्यस्थीनी माता आहे, मी संत ज्यूड थदेऊस जे आपले कुटुंबीय, असहाय्य संकटग्रस्तांना सहाय्य करणारे आहेत यांच्याद्वारे व त्याच्या मध्यस्थीने आमच्या प्रार्थना तू स्वीकार व त्या फळदायी कर. आमेन

  1. हे भागीवंत प्रेषिता संत ज्यूड थदेऊस, संकटग्रस्त लोकांच्या सहाय्यका तू ईश्वराद्वारे ख-या श्रद्धेचे प्रमाण देण्यासाठी निवडीलेला प्रेषित होतास. तू धर्मासाठी सर्व प्रकारचे अत्याचार सहन केलेस आणि धर्मासाठी आपला प्राण अर्पण केलास, तू आम्हाला असा दृ़ढ़ विश्वास दे की,सर्व प्रसंगी आणि सर्व परिस्थितीत आम्ही आनंदाने राहू. तसेच मरणाला सामोरे जाण्यास आम्ही तयार राहू. प्रिय संता आम्हाला प्रायश्चित्ताद्वारे आमचे शरीर शुद्ध ठेवण्यास प्रोत्साहन दे कारण जगासाठी व स्वत: साठी मरून सदासर्वकाळ परमेश्वराजवळ राहू व पुण्यकाळ प्राप्त करू.
    (आमुचे बापा, नमो मरीया, व गौरव बापाला)

  2. हे भागीवंत संत ज्यूड थदेऊस आमच्या तारणकत्‍ र्याच्या नातेवाईका तू आपल्या धर्मविश्वासासाठी प्राणाची पर्वा केली नाहीस. आम्ही देवाशी आणि ख्रिस्तसभेशी प्रामाणिक राहावे, आमची कर्तव्ये पार पाडावीत, दु:ख सहन करण्यासाठी सदैव तयार असावे व आमचे जीवन चांगल्याप्रकारे जगण्यास तू आम्हाला सहाय्य कर. जेणेकरून आम्ही संतांबरोबर ईश्वरीराज्य गौरवाने मिळवू शकू.
    (आमुचे बापा, नमो मरीया, व गौरव बापाला)

  3. हे भागीवंत संत ज्यूड थदेऊस परमेश्वराला संतुष्ट करणे हेच तुइया जीवनाचे ध्येय होते. आम्हाला अशी कृपा दे की, आम्ही देवाच्या आज्ञापालन करून आमच्या मुक्तीसाठी प्रयत्न करावे व धर्मासाठी सर्वप्रकारचे कष्ट धैर्याने सहन करण्यास तुझयासारखे उत्सुक असावे म्हणजे संकटातून मुक्त झाल्यावर आम्हाला देवाच्या राज्यात शाश्वत जीवनाचा मुकुट मिळेल. आमेन.
    (आमुचे बापा, नमो मरीया, व गौरव बापाला)

ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आपण पात्र व्हावे म्हणून

हे संत ज्यूड थदेऊस आम्हासाठी प्रार्थना कर,

आपण प्रार्थना करूया
हे परमेश्वरा तू तुझा प्रेषित संत ज्यूडद्वारे आम्हाला तुया नावाचे ज्ञान दिले आहेस, आम्हाला असे वरदान द्या की, आम्ही आमच्या जीवनात सद्गुणांची जोपासना करावी आणि संतांचा आदर्श डोळासमोर ठेवून, त्यांची किर्ती वर्णावी व आम्ही अधिकाधिक पवित्र व्हावे, ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभु येशुख्रिस्ताद्वारे करतो। आमेन

सन्त जूड से प्रार्थना

(हतोत्साहित समस्याओं में बोलने योग्य)

हे सन्त जूड महिमापूर्ण प्रेरित, प्रभु येसु के विश्वासी सेवक व मित्र, विश्वासघाती नाम के कारण कईयों ने तुझे भुला दिया। लेकिन कलीसिया तुझे हतोत्साहित मामलों के संरक्षक के नाम से सम्मान करता हैं, मुझ निस्सहाय के लिये प्रार्थना कर कि मैं सभी ज़रूरतों, उलझनों व कष्टों में सान्तवना प्राप्त कर सकूँ,

विशेषकर (यहाँ अपनी इच्छा का जिक्र करें) ताकि मैं सदैव सन्तों की संगति में ईश्वर का गुणगान कर सकूँ। हे सन्त जूड, प्रेरित, शहीद व प्रभु येसु ख्रीस्त, माँ मरियम व सन्त जोसफ के निकटतम परिवारजन, हमारे लिये प्रार्थना कर । आमेन।